tag:blogger.com,1999:blog-88510855830523742532024-02-07T20:24:36.335-08:00रमेश ठोंबरे - Ramesh Thombreशृंगाराचे अंग, रसराज संग | हास्याचे तरंग, सदा कदा ||
भक्तीचा उमाळा, कारुण्याचा लळा | भाव तो वेगळा, नित्य नवा ||
भयानक फार, वीरत्व प्रखर | रौद्राचे जहर, दावितसे ||
बीभत्स ओंगळ, शांत तो निर्मळ | रस हे सकळ, लेखणीत ||Ramesh Thombrehttp://www.blogger.com/profile/10463427190023023890noreply@blogger.comBlogger377125tag:blogger.com,1999:blog-8851085583052374253.post-4398860809199571322024-01-10T23:55:00.000-08:002024-01-10T23:55:46.905-08:00 Ramesh Thombrehttp://www.blogger.com/profile/10463427190023023890noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8851085583052374253.post-10359181034461929902024-01-02T23:25:00.000-08:002024-01-02T23:43:22.009-08:00हारा वही जो लढा नहीं !
चंबळ - गुन्हेगारी, राजकारण, भ्रष्टाचार आणि शिक्षणाचा खालवलेला दर्जा या साठीच कुप्रसिद्ध असलेला देशाचा एक भाग. या भागात आत्मसान्मानान जगणं म्हणजे व्यवस्थेविरोधात उभं राहणं. मनोजचे वडील तेच करतात परिस्थिती हालाखीची असतानाही भ्रष्टाचाराला विरोध करतात आणि विधायकजींची नाराजगी ओढवून घेतात. त्यांना सरकारी नोकरीतून सस्पेंड केलं जातं. ते स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कुटुंबाचा विरोध पत्करून Ramesh Thombrehttp://www.blogger.com/profile/10463427190023023890noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8851085583052374253.post-11410309411051926042023-12-15T01:36:00.000-08:002023-12-15T01:36:46.085-08:00असामान्य बुद्धिमत्तेचा असामान्य संघर्ष
एखादा माणूस सज्जन असेल, कृतत्ववान असेल तर त्याचं भविष्य उज्वलच असेल यात शंका नाही त्याहीपुढे जाऊन तो निस्वार्थी, देशाभिमानी, देशभक्त आणि देशासाठी झुंजणारा असेल तर, देश त्याला डोक्यावर घेऊन नाचेल, देशाला त्याचा अभिमान असेल... असच ना !
मलाही असंच वाटतं, असंच असायला हवं आणि बहुतांशवेळी असंच असतं ही... पण एखाद्या अश्याच असामान्य कृतत्ववान आणि देशभक्ताच्या बाबतीत मात्र नेमकं उलटं होत असतं... जनू Ramesh Thombrehttp://www.blogger.com/profile/10463427190023023890noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8851085583052374253.post-37118165383427025392022-10-01T03:21:00.002-07:002022-10-01T03:21:44.206-07:00महात्मा गांधी जयंती सप्ताह निमित्त एक कविता - बापू परत रिस्क घ्याल का ?Ramesh Thombrehttp://www.blogger.com/profile/10463427190023023890noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8851085583052374253.post-20622608426378612332022-10-01T03:19:00.002-07:002022-10-01T03:20:11.309-07:00Ramesh Thombrehttp://www.blogger.com/profile/10463427190023023890noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8851085583052374253.post-90555115908311559852022-10-01T03:11:00.004-07:002022-10-01T03:16:26.757-07:00खयाले शेर - उपक्रम (भाग - 1)खयाले शेर - उपक्रम (भाग - 1)
Khayal-e-Shre
Episode - o1
You Tube Link
https://youtu.be/ueZzvGtZaBc
Ramesh Thombrehttp://www.blogger.com/profile/10463427190023023890noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8851085583052374253.post-30220555870813424092022-05-04T00:40:00.001-07:002022-05-04T00:40:06.142-07:00~ चेहऱ्यावर पुन्हा चेहरे पाहिले ~
चेहरे मी किती नागडे पाहिले
चेहऱ्यावर पुन्हा चेहरे पाहिले
ऐकताना जरी हायसे वाटले
वेगळे पण तिचे वागणे पाहिले
पाहिला ना मनासारखा चेहरा
चेहऱ्याने जरी आरसे पाहिले
एक गेला तडा चेहऱ्यावर पुन्हा
आरश्याने तिचे बोलणे पाहिले
चांगले मी जगाला जरी मानले
फार नव्हते कुणी चांगले पाहिले
ओठ होते तिचे फार आसूसले
चेहऱ्यावर तरी लाजणे पाहिले
भूक होती तवा गोड होत्या कण्या
पोट भरल्यावरी चोचले पाहिले
ओळ आली जरी Ramesh Thombrehttp://www.blogger.com/profile/10463427190023023890noreply@blogger.com8tag:blogger.com,1999:blog-8851085583052374253.post-76142539921839968632022-05-04T00:34:00.001-07:002022-05-04T00:34:42.394-07:00#भोंग्यवर_भोंगाRamesh Thombrehttp://www.blogger.com/profile/10463427190023023890noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8851085583052374253.post-49595339035997700092022-01-26T00:36:00.000-08:002022-01-26T00:36:27.978-08:00~ जसा अवखळपणा वाऱ्यामध्ये आहे ~
जसा अवखळपणा वाऱ्यामध्ये आहे
तसे मूल तान्हे माझ्यामध्ये आहे
आह कुणाची ही इथवर पोचत नाही
मैफल तर उरली शिट्यामध्ये आहे
काटा फुलाहून वरचढ वाटत आहे
समजेना कुठल्या तोऱ्यामध्ये आहे
मी कोणाच्याही पुढ्यात वाकत नाही
माझे भविष्य माझ्या हातामध्ये आहे
झोपीमध्ये मी सताड जागा असतो
स्वप्न एक उघड्या डोळ्यामध्ये आहे
डोके खरेच माझे जड झाले माझे
विचार एक वेगळा डोक्यामध्ये आहे
फिरून ही दुनिया पुन्हा इथेच येतोRamesh Thombrehttp://www.blogger.com/profile/10463427190023023890noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-8851085583052374253.post-44470613300808128832021-12-16T19:50:00.001-08:002022-05-04T00:37:23.393-07:00~ पाय जेंव्हा ढेकळानी सोलली ~
पाय जेंव्हा ढेकळानी सोलली
खूण तेंव्हा ओळखीची पोचली
गाव माझें ज्या दिशेला यायचे
एक खिडकी त्या दिशेला ठेवली
याद आली की निघावे लागते
गाव असते वाट पाहत आपली
जायचे नव्हतेच नुसते कोरडे
आठवण मग सोबतीला घेतली
गाईच्या डोळ्यात जेंव्हा पाहिले
गाय सुद्धा ओळखीचे बोलली
ओल असते गाव अन शेतातही
कोरडी नसतात नाती येथली
- रमेश ठोंबरेRamesh Thombrehttp://www.blogger.com/profile/10463427190023023890noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8851085583052374253.post-66968878450249369392021-12-07T19:11:00.000-08:002021-12-07T19:11:05.384-08:00~ शाळा ~
प्रेम खरे तर माझे, इतकेही बालिश नव्हते
ते वय असावे जे, माझ्याशी बांधील नव्हते
ती बसून बाकावर, फळ्यास न्याहाळत होती
मज फळा पाहण्याचे, कुठलेही कारण नव्हते
शाळा भरत असावी, ती केवळ तिच्याचसाठी
या शिवाय शाळेचे, मम लेखी महत्व नव्हते
ती वर्गामध्ये नव्हती, तेंव्हाही दिसली होती
तिच्या दर्शनासाठी, मज कसले बंधन नव्हते
अभ्यास मी तर केला, बस तिला जाणण्यासाठी
पण तिला जाणण्याचे, तेंव्हाही पुस्तक Ramesh Thombrehttp://www.blogger.com/profile/10463427190023023890noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8851085583052374253.post-63851849020112998632021-09-01T22:25:00.001-07:002021-09-07T23:42:35.823-07:00 ~ या जगण्याचे सोने झाले असते ~वेदनेत जर हसता आले असतेया जगण्याचे सोने झाले असतेअर्ध्यावर्ती थांबून गेलो असतोमला कुणी जर थांब म्हणाले असतेगोष्टीमध्ये नावच आले नसतेकासव जर हरण्याला भ्याले असतेमहत्व प्रत्येकाचे असते कारणहे नसते तर तेही आले नसतेजर मदतीला गुलाब, गजरे नसतेभांडण खटके रोज उडाले असतेजरी आपले दुःख सारखे असतेतरी निराळे अपुले प्याले असते- रमेश ठोंबरेRamesh Thombrehttp://www.blogger.com/profile/10463427190023023890noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8851085583052374253.post-53398703671283567202020-05-28T05:22:00.002-07:002020-05-28T05:22:39.461-07:00लस
■
हा अंधार,
ही दिवेलागण
ही पायपीट
हा थाळीनाद
सहन होत नाही आता काहीच
या काळानच
टोचून द्यावी एखादी लस
या जगण्याला आरपार
आणि खेळू द्यावं पॉज झालेलं हे
जगणं सभोवताल
शेणामातीच्या हातांना
नको सॅनीटायझरचा वास
अन गच्च भरून घेता यावेत
फुफुसांमध्ये श्वास
कष्टकऱ्यांच्या हाताला
पुन्हा मिळुदे काम
हवेच्या गार झुळकेसाठी
पाठीवरती घाम
गावातल्या मित्राला वाटू नये
शहरातल्या दोस्ताची भीती
आणि छातीवर वार Ramesh Thombrehttp://www.blogger.com/profile/10463427190023023890noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8851085583052374253.post-40784688101109738792020-05-20T07:14:00.001-07:002020-05-20T07:14:15.317-07:00आता लॉकडाऊन उघडलं तरी टेन्शन नाही !
■
पहाटे जाग आली
घड्याळ पाहिलं
वेळ झाली होती ...
बायकोला उठवलं ...
ती कामाला लागली
मी बाथरूम गाठली
सर्व विधी उरकले
अंघोळ केली
कपडे केले
नास्ता केला
चहा घेतला ...
मी पुन्हा माझी आवरा आवर केली
बायकोने पेन, रुमाल डबा दिला
मी लॅपटॉप घेतला
ब्यागेत घातला
मोजे, बूट घेतले
पायात घातले
बाहेर आलो
सगळी कडं शांत शांत ...
मी ब्याग गाडीत ठेवली
मी गाडीत बसलो
गाडी सुरू Ramesh Thombrehttp://www.blogger.com/profile/10463427190023023890noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-8851085583052374253.post-56963046765370261802020-05-04T09:36:00.000-07:002020-05-04T09:36:34.885-07:00ओठांवरती घ्यावे म्हणतो
ओठावरती घ्यावे म्हणतो
तुला गुणगूणावे म्हणतो !
अश्रू होवून पदरी पडलो
मोती बनून जावे म्हणतो
आठवून मी थकलो तुजला
आठवांत तव यावे म्हणतो
तीमिराचा या नाश कराया
स्वत:च 'समिधा' व्हावे म्हणतो
कुशीत तुझिया डोळे मिटुनी
मृत्यू गीत हे गावे म्हणतो
.......................................................................
"अपने होंठों पर सजाना चाहताRamesh Thombrehttp://www.blogger.com/profile/10463427190023023890noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8851085583052374253.post-9685550524432907222020-05-04T09:33:00.001-07:002020-05-04T09:33:50.620-07:00ओल आटलेल्या शहरात ...
■
लॉकडाऊन असलेल्या शहरात...
ओस पडलेत रस्ते
अन ओसाड झालीत मनं
आटून गेलाय मायेचा निर्मळ स्पर्श
निर्जंतुकीकरणाच्या रेट्यानं
रखरखीत झालेत ओले हात
पेटत चाललीय पोटातली धग
विझत चाललीय डोळ्यातली आस
सुटत चाललेत हातातले हात !
वाढत चाललंय
माणसामाणसातलं अंतर
'दूर राहा, सुरक्षित राहा !'
असलं काहीतरी
वैश्विक म्हणून भरवलं जातंय
रिकाम्या माणसांच्या
रिकाम्या डोक्यात ....
'घरी राहा, सुरक्षित राहा !'
म्हणून Ramesh Thombrehttp://www.blogger.com/profile/10463427190023023890noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8851085583052374253.post-28001639558825873512020-04-27T03:45:00.001-07:002020-04-27T03:45:13.688-07:00स्पर्श
■
लॉकडाऊन आलेल्या शहरातील
माझ्या घराच्या खिडकीतून
मी पाहतो आहे
स्वच्छ, निरभ्र आकाश !
आकाशात स्वच्छंद उडणाऱ्या
पक्ष्यांच्या रांगा ....
अजून काय करावं
या रिकाम्या दिवसात
म्हणून मग मी ठेवतो
पक्षांसाठी,
दाना पाणी
घराच्या बाल्कनीत ..
तसे उतरतात पक्षी
एक एक करून
दाणे टिपतात ...
पाणी पितात ...
आणि निघून जातात
एक एक करून
पक्षी कधीच
स्पर्श सुद्धा करत
नाहीत माणसांना ...
आणि त्यांच्यातील एखाद्यानं
Ramesh Thombrehttp://www.blogger.com/profile/10463427190023023890noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8851085583052374253.post-80076837346801175042020-04-26T23:27:00.003-07:002020-04-26T23:27:57.553-07:00~ घेतले आहेस जर वाचून तू ~
घेतले आहेस जर वाचून तू
घेत का नाहीस मग समजून तू ?
वाईटांचे होत गेले चांगले
काय झाले चांगले वागून तू !
सोडले आहे तुला पाण्यात मी
बुडव अथवा ने, तुज वाहून तू
काय आहे राहिले सांगायचे ?
सांग ते नाहीस का जाणून तू ?
सांग आम्ही काय मग समजायचे ?
घेतले जर दार ही लावून तू
वेगळा आहेस पण जाणून घे
वेगळा नाहीस तिज वाचून तू !
'मी विटेवर फार पडलो एकटा'
घे तिच्याशी आज हे बोलून तू
गरज आहे माणसाची आजही
ये Ramesh Thombrehttp://www.blogger.com/profile/10463427190023023890noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-8851085583052374253.post-20345395665715846842020-04-22T23:08:00.000-07:002020-04-22T23:08:41.086-07:00|| एका सुक्षमाने ||
वाढले अंतर
वाढला दुरावा
समतेचा दावा
फोल केला ||
माणसाचा कर
माणसाचे घर
माणसाचा श्वास
नासविला ||
ऐसे कैसे आले
अमंगळा उत
अ-स्पृश्याचे भूत
मातीयले ||
एका सुक्षमाने
गिळीले आकाश
गिळीला प्रकाश
विश्वाचा या ||
- रमेश ठोंबरे
Ramesh Thombrehttp://www.blogger.com/profile/10463427190023023890noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8851085583052374253.post-51226840467608119622019-07-02T01:18:00.004-07:002019-07-02T01:38:35.840-07:00आकाशवाणी - अक्षर - 'मी व माझी कविता'
आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावर १ जुलै २०१९ रोजी सायंकाळी ६.३५ वा अक्षर या कार्यक्रमात प्रसारित झालेल्या 'मी व माझी कविता' या माझ्या मुलाखत व कविता वाचन कार्यक्रमाची लिंक !
https://soundcloud.com/ramesh-thombre-118313985/radio-002-101-7
Ramesh Thombrehttp://www.blogger.com/profile/10463427190023023890noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8851085583052374253.post-84676180877450209712019-01-17T19:42:00.000-08:002019-07-02T01:08:57.244-07:00आभाळाच्या डोक्यावरती.....
आभाळाच्या डोक्यावरती छप्पर असते
अन धरतीच्या पोटामध्ये तळघर असते
चिंता करणे मक्तेदारी आईची पण
बापाच्याही हृदयामध्ये जर तर असते
पैसा अडका, बंगला गाडी, तुमच्यासाठी
त्याच्यासाठी केवळ त्याचे वावर असते
गंडा-दोरी, औषध-गोळी दहशत नुसती
नजर प्रियेची जखमेवरची फुंकर असते
पाहत नाही, ऐकत नाही, बोलत नाही
नुसते हसते, ते बापूंचे, बंदर असते !
शिकला नाही त्याच्या डोक्यावरती ओझे
शिकतो आहे त्याच्या पाठी दप्तर Ramesh Thombrehttp://www.blogger.com/profile/10463427190023023890noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-8851085583052374253.post-46946317060766311612019-01-12T23:03:00.002-08:002019-01-12T23:03:26.662-08:00नको बंगला अन नको चांदवा
...
नको बंगला अन नको चांदवाहवा रे मिठीचा तुझ्या गोडवा
.
तुला भेटल्यावर समजले मलातुझी भेट म्हणजे खरा पाडवा
.
तुझ्या बाहुपाशातली ऊब देनको स्वैर धुंदीतला गारवा
.
मला लाभली ही अशी देणगीतुझी कौतुके अन तुझी वाहवा
.
जरी जन्म गेला तुझ्या भोवतीतरी दर्शनाची तुझ्या वाणवा
.
उधळले मनाने पुन्हा जोंधळेउतरला पुन्हा आठवांचा थवा.
- रमेश ठोंबरे
Ramesh Thombrehttp://www.blogger.com/profile/10463427190023023890noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8851085583052374253.post-86608160036246621712018-12-12T05:14:00.001-08:002018-12-12T05:14:15.605-08:00पत्रोत्तर
मित्रा,तुझे पत्र मिळालेतू मजेत आहेस हे समजले.आम्ही ही इकडे मजेत आहोत ....फरक फक्त हाच की मागच्यापेक्षा ....यावेळीचा उन्हाळा जरा जास्तच कोरडा आहे.
तु म्हणतोस, ‘गावाकडं यायचंय ...’‘‘कशाला येतोस ?फार उशीर झाला आहे रे आता ..आपण दिवसभर डुंबायचो ती विहीरकधीच आटली आहे.
पुर्वी नवविवाहीता मोठ्या विश्वासानेपाणी भरायच्या त्या विहीरीवर...दरम्यानच्या काळात त्यातील कित्येकजणींनीआत्महत्या केलीय .. त्याच Ramesh Thombrehttp://www.blogger.com/profile/10463427190023023890noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8851085583052374253.post-76117723957619555842018-12-02T07:23:00.001-08:002018-12-02T07:23:54.024-08:00आरक्षण हवंय !
काही काळासाठी दिलेलं आरक्षण
या देश्याच्या भाळावरची अमीट खूण होऊन बसलंय
बाबासाहेब,
या देशात लोकशाही असली तरी
हा देश राजकारण्यांच्याच तालावर नाचणार
हे माहीत नव्हतं का तुम्हाला ?
बाबासाहेब,
आज सगळे प्रश्न मागं पडलेत
अन मागासलेपण दाखवण्याची शर्यत सुरू झालीय.
निवडणूका जवळ आल्या की
जात धर्माच्या अस्मिता टोकदार होतात ...
मंदिर मस्जिदी आठवतात ...
अश्याच कुठल्यातरी गोंधळात
शिक्षणाचं बाजारीकरण करणार Ramesh Thombrehttp://www.blogger.com/profile/10463427190023023890noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8851085583052374253.post-47783843483444333882018-09-27T02:45:00.000-07:002018-09-27T02:45:03.011-07:00चांदणे चांदणे चांदणे व्हायचे
चांदणे चांदणे चांदणे व्हायचे
भेटल्यावर तिचे बोलणे व्हायचे
पोचण्याला कुठे ध्येय होते मला
सोबतीने तिच्या चालणे व्हायचे
चालताना जरा मीच थांबायचो
पाठमोरे तिला पाहणे व्हायचे
हात हातामध्ये घेतल्यावर तिचा
जीवघेणे तिचे लाजणे व्हायचे
ठेवले मी तिला पापणी आड पण
काळजावर छबी गोंदणे व्हायचे
पत्र होते तिचे एक गंधाळले
रातभर वाचणे जागणे व्हायचे
शब्द देऊनही 'तेच' टाळायची
शेवटी 'जे' तिला मागणे व्हायचे
Ramesh Thombrehttp://www.blogger.com/profile/10463427190023023890noreply@blogger.com0