Mar 22, 2013

बोलायाची झाली चोरी

बोलायाची झाली चोरी 

भ्रष्ट जाहली जनता सारी 
निवडून दिधले भ्रष्ट्राचारी 

'षंढ' म्हणुनी चेतून उठली 
नपुंसकाची हाय तुतारी !

पोट आमुचे भरतो म्हणुनी 
शेतकऱ्याची उपासमारी 

अहिंसेत ही असते ताकत, 
गांधी तुमची मूर्त करारी 

देशासाठी लढेन म्हणतो 
मरता मरता बघा पुढारी 

भाई दादा म्हणूत त्यांना 
'गुंड' लागते म्हणे जिव्हारी ! 

दात, आपुले, ओठ आपुले 
बोलायाची झाली चोरी.

- रमेश ठोंबरे