Sep 5, 2014

शर्यत

  
 .
तू शर्यत लावायचास ….
अन रिचवत जायचास पेल्या मागून पेले,
त्याच सोबत तू रिचवायचास,
तुझ्या आतले कितीतरी दु:खं
तुझ्याही नकळत.
.
.
.
आता मला चांगलंच अंगवळणी पडलंय
तुझं हे शर्यत लावत जाणं,
अन हरल्या मनानं
असं दु:खांला जिंकून घेणं


- रमेश ठोंबरे     

1 comment:

  1. आपला ब्लॉग " मराठी ब्लॉग लिस्ट " या मराठी ब्लॉग डीरेक्टारीवर जोडा आणी आपल्या ब्लॉग ला भेट देणाऱ्यांची संख्या वाढवा.

    ब्लॉग ची लिंक- http://marathibloglist.blogspot.in/

    ReplyDelete