चेहरे मी किती नागडे पाहिले
चेहऱ्यावर पुन्हा चेहरे पाहिले
ऐकताना जरी हायसे वाटले
वेगळे पण तिचे वागणे पाहिले
पाहिला ना मनासारखा चेहरा
चेहऱ्याने जरी आरसे पाहिले
एक गेला तडा चेहऱ्यावर पुन्हा
आरश्याने तिचे बोलणे पाहिले
चांगले मी जगाला जरी मानले
फार नव्हते कुणी चांगले पाहिले
ओठ होते तिचे फार आसूसले
चेहऱ्यावर तरी लाजणे पाहिले
भूक होती तवा गोड होत्या कण्या
पोट भरल्यावरी चोचले पाहिले
ओळ आली जरी काळजातुन तिच्या
भाव डोळ्यामधे कोरडे पाहिले
सोसण्याचा मला त्रास नव्हता कधी
फार होते जरी सोसणे पाहिले
- रमेश ठोंबरे
सर शब्द नाहीत या कवितेचे वर्णन करायला
ReplyDelete१० वेळ वाचली तरी मनाचे समाधान नाही झाले .
ReplyDelete