Jan 5, 2014

बेड्या



तुझ्या पायात भिंगरी आहे 
दिवसभर घरात गर गर फिरण्यासाठी.
तुझ्या पायात बांधले आहेत चाळ,
घरात घरात फक्त आमच्या मर्जीखातर नाचण्यासाठी,
आम्हाला काय हवं ... काय नको ते पाहण्यासाठी.
घरातल्या घरात घरभर गर गर फिरत जा.
घरातल्या घरात आमच्या तालावर नाचत जा !
यातच तुझं भलं आहे ....
आणि समाजाचं ही !

तू कधी विद्रोहाचा विचार ही करू नकोस
कारण तुझ्या दुसर्या पायात ...
आम्ही ठोकल्या आहेत बेड्या ... संस्कृतीच्या.
आता तूच ठरव ...
त्या तोडायच्या आहेत तुला ?
तोडायच्या तर खुशाल तोड ...
पण त्या आधी ध्यानात ठेव ....
तुझ्या पायातील या संस्कृतीच्या बेड्या तू तोडल्यास तर ...
तुला रस्त्या रस्त्यावर जे दिसेल ...
ते कदाचित आजच्यापेक्षा किती तरी जास्त विदारक असेल.

- रमेश ठोंबरे 

2 comments:

  1. शेवटचे सत्य अगदी निर्विवाद कठोर आहे...बाहेर पडणाऱ्या स्त्रीला नागवलेच पाहिजे, ही समाजाची धारणा आहे.

    ReplyDelete