Jan 12, 2019

नको बंगला अन नको चांदवा

...
नको बंगला अन नको चांदवा
हवा रे मिठीचा तुझ्या गोडवा
.
तुला भेटल्यावर समजले मला
तुझी भेट म्हणजे खरा पाडवा
.
तुझ्या बाहुपाशातली ऊब दे
नको स्वैर धुंदीतला गारवा
.
मला लाभली ही अशी देणगी
तुझी कौतुके अन तुझी वाहवा
.
जरी जन्म गेला तुझ्या भोवती
तरी दर्शनाची तुझ्या वाणवा
.
उधळले मनाने पुन्हा जोंधळे
उतरला पुन्हा आठवांचा थवा
.
- रमेश ठोंबरे

No comments:

Post a Comment