Jan 17, 2019

आभाळाच्या डोक्यावरती.....आभाळाच्या डोक्यावरती छप्पर असते
अन धरतीच्या पोटामध्ये तळघर असते

चिंता करणे मक्तेदारी आईची पण
बापाच्याही हृदयामध्ये जर तर असते

पैसा अडका, बंगला गाडी, तुमच्यासाठी
त्याच्यासाठी केवळ त्याचे वावर असते

शिकला नाही त्याच्या डोक्यावरती ओझे
शिकतो आहे त्याच्या पाठी दप्तर असते

गंडा, दोरा, औषध, गोळी दहशत नुसती
नजर प्रियेची जखमेवरची फुंकर असते

पाहत नाही, ऐकत नाही, बोलत नाही
नुसते हसते, ते बापूंचे, बंदर असते !

- रमेश ठोंबरे

1 comment:

  1. नोकरी विषयक इंटरनेट वरील सर्व जाहिराती एकाच ठिकाणी मिळविण्याचे केंद्र म्हणजे mhnmk.com | NMK All Maha NMK Job Recruitments advertisement details in Marathi in one place.
    MH NMK नोकरी माहिती केंद्र | Maha NMK jahirat

    ReplyDelete