Mar 8, 2011

१०) कैवल्याची मूर्ती

कैवल्याची मूर्ती
प्रियेस म्हणेल |
मर्म हि जाणेल
कैवल्याचे || १ ||

प्रियेच्या लोचनी
पाहिल ब्रह्मांड |
विश्वाचे भ्रमन
नको मला || २ ||

कर्म तेच सांगा
मम पामराला |
पूजील प्रियेला,
रात दिनी || ३ ||

नित्य, सदा गातो
गुण मी प्रियेचे |
याहुनी या 'वाचे'
काय श्रेष्ठ ? || ४ ||

रमा म्हणे मज,
अवघ्याचा कंटाळा |
एक प्रियतमा,
आवडसी || ५ ||

- रमेश ठोंबरे

९. || लागता समाधी ||

लागता समाधी
प्रियेच्या भक्तीची |
परीक्षा शक्तीची
नको नको || १ ||

मोडेल समाधी
कोणी एक नर |
दुर्जन तो ठार
समजावा || २ ||

हासन्यावरी का
नेता प्रिया संग |
समाधीत भंग
आणू नये || ३ ||

प्रियेची महती
तुम्हास ना ठाव |
पूजताती देव
दगडाचे || ४ ||

रमा म्हणे मज
सर्वाचा कंटाळा |
एक प्रियतमा
आवडसी || ५ ||

- रमेश ठोंबरे

८. || प्रियेची ती भेट ||


प्रियेची ती भेट
पहिलीच झाली |
स्वप्नी मम आली
पहाटेच्या || १ ||

पहाटेचे स्वप्नं
उलटे प्रहर |
आता तो विरह
साहवेना || २ ||

भेटेल ती कधी
लागलीच आस |
घेतला मी ध्यास
पहाटेचा || ३ ||

पहाटेच स्वप्नं
सत्यात ते आलं |
दर्शन ते दिले
आज पुन्हा || ४ ||

संपणार कधी
स्वप्नांचा हा खेळ |
काढ आता वेळ
सत्यातही || ५ ||

- रमेश ठोंबरे