Mar 8, 2011

८. || प्रियेची ती भेट ||


प्रियेची ती भेट
पहिलीच झाली |
स्वप्नी मम आली
पहाटेच्या || १ ||

पहाटेचे स्वप्नं
उलटे प्रहर |
आता तो विरह
साहवेना || २ ||

भेटेल ती कधी
लागलीच आस |
घेतला मी ध्यास
पहाटेचा || ३ ||

पहाटेच स्वप्नं
सत्यात ते आलं |
दर्शन ते दिले
आज पुन्हा || ४ ||

संपणार कधी
स्वप्नांचा हा खेळ |
काढ आता वेळ
सत्यातही || ५ ||

- रमेश ठोंबरे

No comments:

Post a Comment