Mar 21, 2012

कोणी म्हणे ...... २ ..................५)कोणी म्हणे मी रे
सहजची आलो |
येथलाची झालो
खर्या अर्थी ||

कोणी म्हणे माझी
भूक फार आहे
पूर रोज पाहे
कवितांचा ||

कोणी म्हणे गड्या
सापडला मार्ग
दूर आता स्वर्ग
दोन बोटे ||

कोणी म्हणे मज
आवडे हा मेळा
होती सर्व गोळा
एक धागी ||

कोणी म्हणे काय
आहे येथं खास
सोडवेना कास
माझे माय ||

- म.क.
(रमेश ठोंबरे)

No comments:

Post a Comment