Mar 23, 2012

कोणी म्हणे ...... ३ ..................६)कोणी म्हणे येथं
काव्य फार झाले
त्याला मी दावले
अभिप्राय ||

कोणी म्हणे येथं
चौर्य हि उदंड
दावला मी दंड
डिलीटाचा ||

कोणी खोट काढी
शील अश्लीलाची
त्याला दिल्या शाली
जोड्यां सवे ||

कोणी म्हणे 'फेक*'
आहे येथं फार
'ई-बुक' 'त्यांचेची*'
गाजविले ||

कोणी म्हणे आहे
पसाराच फार
त्याला वर्तमान
दाखविले ||

- म.क.
(रमेश ठोंबरे)

No comments:

Post a Comment