Oct 17, 2012

~ तुझे भास होते ~खरे खास होते
तुझे भास होते

जरी गोड भासे,
उरी त्रास होते.

उसासे जरासे,
जरा श्वास होते

तुला टाळणेही
कुठे रास होते ?

मरावे म्हणालो,
तुझे ध्यास होते.

जगावे रमेशा,
असे फास होते.

- रमेश ठोंबरे

No comments:

Post a Comment