Mar 8, 2011

१. || प्रियेचे हे रूप ||

प्रियेचे हे रूप,
पहिले म्या डोळा |
भाव तो वेगळा,
लोचनात ||१||

अधरी तियेच्या
विसावली धुंदी
होऊनिया बंदी
पडीयलो ||२||

सुटेनात आता,
मोहाचे ते पाश |
लागलाची ध्यास,
दर्शनाचा ||३||

रोज होते भेट
नित्य वाटे नवे
काय काय घ्यावे
साठऊन ||४||

अडलो पुरता
प्रियेच्या रुपात
रात हि जपास
पुरी नसे ||५||

- रमेश ठोंबरे

No comments:

Post a Comment